ताज्या बातम्या व अद्यतन 📢 गावातील प्रत्येक महत्त्वाची बातमी — एका ठिकाणी, एका क्लिकमध्ये
1️⃣ 📰 या विभागामध्ये ग्रामपंचायतीच्या सर्व ताज्या बातम्या, घोषणा आणि कार्यक्रमांची माहिती दिली जाते.
2️⃣ 📅 येथे तुम्ही ग्रामसभा आणि विशेष उपक्रमांची अद्ययावत माहिती पाहू शकता.
3️⃣ 🏗️ आमचं उद्दिष्ट आहे की गावातील प्रत्येक नागरिकाला वेळोवेळी आणि पारदर्शक माहिती मिळावी.
4️⃣ 📢 सर्व घडामोडी नागरिकांच्या सहभागातून पारदर्शकपणे राबवल्या जातात — तुमचं सहकार्य आमच्यासाठी महत्त्वाचं आहे.
5️⃣ 🌿 नवीन माहिती नियमितपणे येथे प्रकाशित केली जाते, म्हणून हे पान वारंवार भेट द्या आणि गावाच्या प्रगतीशी जोडलेले राहा.
७७ वा प्रजासत्ताक दिन
ग्रामपंचायत तांबुळवाडी , ता-चंदगड येथील ग्रामपंचायत मध्ये ७७ वा प्रजासत्ताक दिनानिमित्त मा.सरपंच मडम सौ.गीता अरुण पाटील यांच्या हस्ते झेंडावंदन व फोटो पुजन करण्यात आले .त्यावेळी गावातील ग्रामस्थ व इतर पदाधिकारी उपस्थित होते .
श्री अनिरुद्ध उपासना केंद्र , तांबुळवाडी येथे श्री मंगलचंण्डिका प्रपत्ती उत्साहातभक्तिभाव चैतन्यात साजरी करण्यात आली.
श्री मंगलचण्डिका प्रपत्ति दि १४ जानेवारी २०२६ स्रियांसाठी ” श्री मंगलचंणडिका प्रपत्ति ” संक्रांतीच्या दिवशी केली जाते. हाच दिवस का? कारण ह्या दिवशी माता महिषासुरमर्दिनीने ॠषी कर्दम व देवहूति ह्याच्या कतराज आश्रमामध्ये महिषासुराला मारण्या साठी पहिल पाऊल ठेवलं. ह्या संक्रांतीच्या दिवशी सूर्यास्तानंतर मोकळ्या जागी स्रियांनी एकत्र येऊन हि श्री मंगलचंणडिका प्रपत्ति करायची असते ही प्रपत्ति केल्यामुळे प्रत्येक स्री तिच्या कुटुंबाची रक्षणकर्ती सैनिक बनते मग ती आई असो, बहिण असो, पत्नी असो,कोणत्याही भूमिकेत असो,ती तिच्या संपूर्ण घराची रक्षणकर्ती बनते. आता ही प्रपत्ति कशी करायची? हि प्रपत्ति चार भिंतींच्या आत न करता,घराबाहेर मोकळ्या जागी (समुद्र / नदीकिनारी,चौकातल्या जागी,गच्चीवर) करणे आवश्यक आहे.